Homeआरोग्यआळंदी म्हातोबाची येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

आळंदी म्हातोबाची येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रा सचिन माथेफोड,पुणे

आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये तब्बल ११५३ पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

शिबिरामध्ये ५३० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३७५ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच १०३ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांच्यावर, पुढील काही दिवसात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिरात हृदय तपासणी, जनरल तपासणी, दातांची तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन, शुगर, रक्तदाब, कान-नाक-घसा तपासणी व मोफत हात व पायांसाठी नोंदणी अशा विविध लाभांसह तपासण्या पार पडल्या. सर्व लाभार्थ्यांना मोफत औषधेही वाटप करण्यात आली.

या उपक्रमामुळे आळंदी म्हातोबाची परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गावातील प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!