Homeआरोग्यमांजरी खुर्द येथील मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

मांजरी खुर्द येथील मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

सचिन माथेफोड,पुणे

मांजरी खुर्द (ता. हवेली) येथे थेऊर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पल्लवीताई युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये तब्बल ११४५ हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

शिबिरादरम्यान ७२० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६४० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ५१ रुग्णांमध्ये मोतीबिंदू, ७ रुग्णांना कान व नाकाचे ऑपरेशन, तर १ रुग्णाला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचे निदान झाले असून, या सर्वांवर आगामी काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याशिवाय ४ नागरिकांना कृत्रिम हात व पाय देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली.

या शिबिरात हृदय तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची घनता तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन, शुगर, रक्तदाब तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सेवांचा समावेश होता. याचबरोबर हात व पायांच्या मोफत कृत्रिम अवयवांसाठी नोंदणी देखील करण्यात आली.

या महाआरोग्य शिबिरामुळे परिसरातील अनेक नागरिकांना महत्त्वाच्या तपासण्या, निदान व उपचार विनामूल्य उपलब्ध झाले असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. अशा महाआरोग्य शिबिरांची शेजारील इतर गावांमध्येही मागणी होताना दिसते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

error: Content is protected !!