उरळी कांचन :
श्री द्वारकाधीश हॉस्पिटल अॅण्ड होमिओपॅथी केअर, उरळी कांचन यांच्या वतीने विजय दिनानिमित्त सर्व आर्मी जवान व देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या नागरिकांसाठी ३ दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर उरळी कांचन रेल्वे स्टेशनजवळ, गुरुकृपा मेडिकल, सुंदरलाल फार्मास्युटिकलच्या पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात येणार असून दिनांक १६ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शिबिर चालणार आहे.
या शिबिरामध्ये मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून,
ECG तपासणी : केवळ ₹50शुगर तपासणी : केवळ ₹20या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.देशासाठी सेवा देणाऱ्या माजी व कार्यरत आर्मी जवानांसह सर्व देशसेवकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



















