Pune: बोपदेव घाटावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेमलेला पोलीस कर्मचारी विक्रांत लक्ष्मण वडतीळे यानेच पर्यटकांकडून जबरदस्तीने ₹२८,००० लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित पोलिसाला निलंबित केले आहे.
५ जून रोजी सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान, चेन्नईहून आलेल्या १९ वर्षीय तरुण आणि त्याच्या मित्रांनी बोपदेव घाट परिसरात छायाचित्रणासाठी हुक्का बाळगलेला होता.
या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवले, मारहाण केली आणि ड्रग्स प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.
















