Homeसामाजिकआळंदी म्हातोबा–कुंजीरवाडी रस्ता; कंत्राटदार गायब, ग्रामस्थ त्रस्त — प्रशासनाची झोप अजूनही...

आळंदी म्हातोबा–कुंजीरवाडी रस्ता; कंत्राटदार गायब, ग्रामस्थ त्रस्त — प्रशासनाची झोप अजूनही गाढ

प्रा.सचिन माथेफोड,पुणे
आळंदी म्हातोबा–कुंजीरवाडी दरम्यानचा मुख्य रस्ता अपूर्ण अवस्थेत राहिल्याने नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात हा रस्ता दलदलीत परिवर्तित झाला असून, चिखल व पाण्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी करूनही रस्त्याचे अपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. “काम पूर्ण न करता कंत्राटदार पसार, पण जनता मात्र खड्ड्यांत अडकली,” अशी बोचरी टीका शेतकऱ्यांनी केली आहे.

पुढे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्या असताना, या रस्त्याच्या स्थितीमुळे जनतेत रोष आहे. पुढाऱ्यांना आता “हांजी-हांजी” करून ग्रामस्थांची नाराजी शांत करावी लागणार आहे.

दरम्यान, रस्त्यालगतच्या दुकानदार व वाहनचालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उरलेले रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.

📸 छायाचित्र: अपुऱ्या दर्जाचे व अर्धवट रस्ता काम — आळंदी म्हातोबा-कुंजीरवाडी मार्गावरील खड्ड्यांची दैनंदिनी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!