Homeसामाजिकलहुजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे युवराज काकडे यांना ‘आरोग्यरत्न सन्मान’ — आरोग्य व...

लहुजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे युवराज काकडे यांना ‘आरोग्यरत्न सन्मान’ — आरोग्य व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव

प्रा एस एम सर,

पुणे (प्रतिनिधी): सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231 व्या जयंती महोत्सवानिमित्त लहुजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे, आरोग्य क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात सातत्याने उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल युवराज काकडे यांना ‘आरोग्यरत्न सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे.

युवराज काकडे हे गेल्या अनेक वर्षांपासून हवेली तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना हॉस्पिटल बिलात सवलत मिळवून देणे, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून मदत मिळवून देणे, हे त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.

थेऊर परिसरात त्यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आणि स्वच्छता मोहिमा राबवून समाजात जनजागृती निर्माण केली आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून देत स्थानिक विकासातही मोलाचे योगदान त्यांनी दिले आहे.

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी युवराज काकडे यांची भेट घेऊन त्यांना जयंती महोत्सवासाठी औपचारिक निमंत्रण दिले.

या सन्मानाबद्दल युवराज काकडे यांनी लहुजी फाउंडेशनचे आभार मानत सांगितले की, हा सन्मान माझ्या नव्हे तर माझ्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा आहे. समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे.”

स्थानिक स्तरावर काकडे यांच्या कार्याचा गौरव होत असून, त्यांचे हे सामाजिक योगदान इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

error: Content is protected !!