Homeसामाजिकदेऊळगाव रसाळमध्ये कृषिकन्यांचे उत्साहात स्वागत बारामती, १७ जून:

देऊळगाव रसाळमध्ये कृषिकन्यांचे उत्साहात स्वागत बारामती, १७ जून:

सचिन माथेफोड,पुणे

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित, डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, बारामती येथील कृषिकन्या देऊळगाव रसाळ येथे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या असून, त्यांचे गावात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमात विशाखा अमृतकर, जान्हवी बागल, केशवी गायकवाड, समिधा जाधव, सृष्टी काळुखे, काजल माने आणि मानसी चौधरी या विद्यार्थिनी सहभागी आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. मीराबाई रसाळ, उपसरपंच दत्तात्रय वाबळे तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ पार पडला.

स्वागतप्रसंगी कृषिकन्यांनी संस्थेचे प्रतीक असलेले रोपटे देऊन मान्यवरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती दिली तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस कसा हातभार लावू शकतो, यावर मार्गदर्शन केले.

गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार असून, शेतीतील कीड व रोग व्यवस्थापन, तसेच पारंपरिक व नवकल्पनांचा अभ्यास केला जाईल, असे कृषिकन्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसमोर सोयाबीन बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमामुळे गावातील शेतीच्या प्रगतीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

अशा प्रकारे कृषिकन्यांच्या सहभागाने व मार्गदर्शनाने संपन्न झालेला हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!