Homeसामाजिकग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ‘कृषिकन्या’ शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ‘कृषिकन्या’ शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

सचिन माथेफोड 
करखेल (ता. बारामती) | दि. १७ जून २०२५

डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामतीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम’ (RAWE) अंतर्गत करखेल (ता. बारामती) गावात आपली प्रत्यक्ष शाश्वत सेवा सुरू केली आहे. येत्या दहा आठवडे या कृषिकन्या गावात राहून शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाचा प्रारंभ १७ जून रोजी ‘ग्रामीण मूल्यांकन कार्यक्रमाने’ झाला. यामध्ये कृषिकन्यांनी गावाचा संपूर्ण नकाशा रांगोळीच्या माध्यमातून सादर केला. या सर्जनशील उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमात गावच्या सरपंच सौ. वैशाली अरुण रणसिंग यांनी उपस्थित कृषिकन्यांचा सन्मान केला. सन्मान प्राप्त कृषिकन्यांमध्ये कु. ज्ञानेश्वरी गायकवाड, कु. सानिका गवळी, कु. सृष्टी गावडे, कु. प्रतीक्षा जंजिरे, कु. प्रगती कदम, कु. गायत्री चव्हाण व कु. स्वस्तिका पाटील यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे, कृषिकन्यांनी गावातील मान्यवर ग्रामस्थांचा सन्मान वृक्षाची रोपटी भेट देऊन केला. या कार्यक्रमास श्री. सतीश भापकर, श्री. संदीप वाबळे, श्री. अरुण रणसिंग यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमात विद्यार्थिनींना प्रा. एस. पी. गायकवाड आणि प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील आठवड्यांमध्ये कृषिकन्यांकडून विविध कृषी सल्ला, प्रशिक्षण शिबिरे, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, महिला सक्षमीकरण व कृषी तंत्रज्ञान याविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामुळे गावकरी व शेतकऱ्यांना थेट कृषी शिक्षणाची व आधुनिक माहितीची उपलब्धता होणार असून, याचा नक्कीच सकारात्मक फायदा गावाच्या कृषी विकासास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!