सोरतापवाडी प्रतिनिधी
दिनांक २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल येथे LLC (Learning Lead Conference) या विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पालकांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. यावेळी पालकांनी शाळेला अत्यंत व्यवस्थित व सकारात्मक सहकार्य केले. कार्यक्रमात विविध विषयांवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा उत्स्फूर्त आणि मनापासून प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे, विचारांचे व शिकण्याच्या प्रक्रियेचे प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमानंतर पालकांनी शाळेबद्दल व उपक्रमांबद्दल अत्यंत सुंदर व प्रेरणादायी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संपूर्ण पालकवर्ग या उपक्रमामुळे आनंदित व समाधान व्यक्त करताना दिसून आला.
या LLC कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवणे, त्यांना प्रत्येक बाबतीत पुढे येण्याची संधी देणे तसेच लहान वयातच विविध कौशल्ये आत्मसात करून सुजाण व जबाबदार नागरिक घडवणे हा होता. हा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री अविनाश मेमाणे तसेच ट्रस्टी रुपाली मेमाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

एकूणच, ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा LLC कार्यक्रम हा शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी व यशस्वी ठरला



















