Homeसामाजिकआपत्तीमध्ये पोलिसांचा माणुसकीचा हात – लोणी काळभोर पोलिसांकडून थेऊर (रुके वस्ती) येथील...

आपत्तीमध्ये पोलिसांचा माणुसकीचा हात – लोणी काळभोर पोलिसांकडून थेऊर (रुके वस्ती) येथील 28 कुटुंबांना दिवाळीपूर्व मदत

प्रा. एस एम सर

हवेली तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. या पावसात अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः थेऊर येथील रुके वस्ती भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आणि नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला.

या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लोणी काळभोर पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून रुके वस्तीतील तब्बल 28 कुटुंबांना शिधावाटप, दिवाळी साहित्य आणि मिठाईचे वाटप केले.

दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आले. या उपक्रमात पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

आपत्तीग्रस्त कुटुंबांना दीपावलीच्या सणाआधी मिळालेली ही मदत म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाचा किरण ठरली. “पोलिस म्हणजे केवळ कायदा राखणारे नव्हेत, तर समाजाशी नाळ जोडणारे आधारवड आहेत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. परिसरात पोलिसांच्या या सामाजिक संवेदनशीलतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...

सचिन माथेफोड,पुणे महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य...

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

error: Content is protected !!