सचिन माथेफोड
दिनांक 05/07/2025 रोजी युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना सचिन पवार यांना लोणीकंद पो. स्टे. गु. र. क्रं. 409/2024, भा.द.वि. कलम 406, 420 या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे *आकाश रमेश पवार, वय 24 वर्षे, रा. फकीर जवळा, ता. धारूर, जि. बीड* हा केसनंद रोड, वाघोली, पुणे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांनी त्यांचेकडील स्टाफ ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सारंग दळे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आहे. नमूद आरोपीताकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार आरोपी नामे *किरण सुंदर घायाळ, वय 32 वर्षे, रा. उरुळी देवाची, पुणे* याचेसह केल्याचे सांगितलेने नमूद आरोपीतास उरुळी देवाची येथून ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यातील अपहार केलेले फोर्चूनर वाहन व नमूद आरोपीतांनी अशाच प्रकारे छत्रपती संभाजी नगर येथून अपहार केलेले इटियॉस कार ( क्रांती चौक पो. स्टे. संभाजी नगर येथे गुन्हा नोंद आहे. ) अशी दोन्ही वाहने मालेगाव, नाशिक येथे विक्री केल्याचे कबुली दिली आहे.
नमूद आरोपीतांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईकामी लोणीकंद पो. स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. श्री राजेंद्र मुळीक सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे-2 या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सारंग दळे, ऋषीकेश व्यवहारे ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, सुहास तांबेकर, शेखर काटे यांचे पथकाने केलेली आहे.



















