सचिन माथेफोड
ग्रामपंचायत आळंदी म्हातोबा येथील सर्व ग्रामपंचायत खातेदारांना घरपट्टी व पानपट्टी 31 मार्च 2025 टक्के भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.ज्या खातेदाराची घरपट्टी व पानपट्टी जमा असेल अशा व्यक्तींना ग्रामस्थांच्या माध्यमातून विविध बक्षीस पुकारण्यात आलेली होती.ही संकल्पना जालिंदर जवळकर यांनी ग्रामसभेत मांडली होती. त्याचे वाटप आज करण्यात आले त्या निमित्ताने पहिले बक्षीस डबल डोल फ्रीज ग्रामपंचायत आळंदी म्हातोबा,दुसरे बक्षीस पीठ गिरण जालिंदर संपत जवळकर यांच्यातर्फे होते, तिसरे बक्षीस कुलर अविनाश सुरेश वाल्हेकर यांच्यातर्फे होते चौथे बक्षीस सिलिंग फॅन शिरीष चंद यांच्यातर्फे होते पाचवे बक्षीस टेबल फॅन गिरीश चंद यांच्यातर्फे होते सहावे बक्षीस मिक्सर काळुराम भोंडवे यांच्यातर्फे होते तर सातवे बक्षीस इस्त्री सौरभ कदम यांच्यातर्फे होते.
त्यानुसार चिठ्ठ्या बनवून त्यातील चिठ्ठ्या निवडण्यात आल्या त्यानुसार बक्षिसे लागलेली ग्रामस्थांची नावे पुढीलप्रमाणे त्यानुसार पहिले बक्षीस विजय नामदेव धावडे दुसरे बक्षीस शिवाजी खंडेराव जवळकर तिसरे बक्षीस लता बाळासाहेब शिवरकर चौथे बक्षीस अशोक किसन झेंडे पाचवे बक्षीस सुरज श्रीहरी काळे सहावे बक्षीस अमृत दिनकर पवार सातवे बक्षीस साहेबराव दगडू शिवरकर यांना मिळाले.
ग्रामस्थानी वेळेत कर भरावा कारण यावरच गावाचा विकास अवलंबून असतो त्यामुळे या अतिशय सुंदर संकल्पनेची सुरुवात यावर्षीपासून झाली यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
















