Homeसामाजिकआळंदी म्हातोबा उत्सव कमिटी निवड पडली पार अध्यक्ष उपाध्यक्षपदी जवळकर

आळंदी म्हातोबा उत्सव कमिटी निवड पडली पार अध्यक्ष उपाध्यक्षपदी जवळकर

सचिन माथेफोड,पुणे

सालाबादप्रमाणे आळंदी म्हातोबा गावाचा उत्सव डिसेंबर महिन्यात येत असून त्यासाठी उत्सव कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड आज दिनांक १६ रोजी पार पडली.यावेळी अध्यक्ष म्हणून महसूल खात्याचे गुणवंत कर्मचारी संजय जवळकर तर उपाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रज्योत जवळकर यांची निवड झाली.मावळते अध्यक्ष दादासाहेब कोलते व उपाध्यक्ष सागर पवार यांनी नारळ देऊन त्यांना सन्मानित केले.यावेळी समस्त ग्रामस्थ नेतेमंडळी आपापल्या भागाचे नेतृत्व करण्यासाठी उपस्थित होते.मागील काही वर्षांपासून ठरलेल्या नियमानुसार नक्की कोणत्या भागाला आणि कोणाला अध्यक्षपद द्यायचे यावरून काहीकाळ मिटिंगमध्ये आवाजी चर्चा सुरू झाली.त्यावेळी प्रत्येक नेत्याने आपापल्या भागाचे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला व यावेळी अध्यक्षपद आमच्याकडेच कसे राहील हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.परंतु चर्चेअंती व वरिष्ठ नेत्यांचा शब्द प्रमाण मानून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड घोषित करण्यात आली.उत्सवाला लागणारी गावची वर्गणी शंभर टक्के वसूल होणे गरजेचे आहे.अन्यथा यात्रेचा खर्च खिशातून करावा लागेल तसेच भागवार पावती पुस्तके ज्या त्या कार्यकर्त्यांनी वेळेत नेऊन जमा झालेली वर्गणी वेळेत कमिटीकडे सुपूर्द करावी अशी सूचना गाव पुरोहित केशव काका तीखे यांनी केली.

यावेळी गावातील अनेक प्रमुख नेते,ग्रामस्थ उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!