Homeसामाजिकमराठा समाजाच्या कुटुंबांनी आता तरी साध्या पद्धतीने लग्न करावे. - गजानन जगताप

मराठा समाजाच्या कुटुंबांनी आता तरी साध्या पद्धतीने लग्न करावे. – गजानन जगताप

लोणी काळभोर प्रतिनिधी -मराठा समाजातील नागरिकांना जागृत करण्यासाठी पुणे – सोलापूर महामार्गावरील सोजश पँलेस येथे सकल मराठा समाज, हडपसर ,हवेली तालुक्यातील नागरिकांची महत्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली होती .पुणे शहर ,पिंपरी -चिंचवड ,सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित होते . 

यावेळी बोलताना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे यांनी सांगितले की नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे आपण आचारसंहितेच्या दोन बाजू ठरवून एक कमिटी नेमून त्या कमिटीद्वारे काम करावे लग्न जरी मोठ्या थाटामाटात केले तरी समाजाची बांधिलकी म्हणून काही निधी मराठा समाजास द्यावा त्यातून त्या निधीचा वापर मराठा समाजातील गोरगरीब मुला मुलींच्या लग्नासाठी होऊ शकतो .

मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांनी हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातुन हगवणे कुटुंबा विषयी चिड निर्माण झाली .त्याविषयी ठिकठिकाणी आंदोलने झाली .बैठका घेतल्या गेल्या . त्यामुळे मराठा समाज विवाह आचारसहिता तयार करून ती आज वाचून दाखवण्यात आली.

यावेळी अनेक मराठा नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी राजेंद्र कोंढरे , गुलाब गायकवाड, राजेंद्र कुंजीर, उत्तम कामठे ,रोहिदास उंद्रे ,कमलेश काळभोर ,सूर्यकांत काळभोर ,रमेश उंद्रे ,संतोष भोसले, गजानन जगताप ,अनिरुद्ध मराठे ,भाऊ जाधव, राजेश काळभोर ,काळूराम चौधरी ,महादेव कुंजीर ,भाऊसाहेब महाडिक, सचिन सुंबे ,सुनील तुपे, अमोल भोसले ,बापू चौधरी, अनिल ताडगे ,सचिन आडेकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. यावेळी हुंडाविषयीची कविता विद्यार्थ्यीनी शिवांजली कामठे हीने म्हणून दाखवली .यावेळी मराठा समाजाने विवाह विषयी केलेली आचारसंहिता वाचून दाखवण्यात आली. समाजात हुंडाबळी जाऊ नये म्हणून विविध २२मुद्दे या आचारसंहितेत घेतले आहेत .यामध्ये लग्नकार्याचे सर्व कार्यक्रम एकाच दिवशी घेण्यात यावे ,बुफे पद्धत बंद करावी त्यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण थांबेल ,स्टेजवर पुढार्‍यांची गर्दी कमी करावी. लग्न वेळेवर लावून सर्वांची वेळेची बचत करावी. जर पुढारी लोकांनी ठरवले की वेळेच्या नंतर लग्न लागण्यास उशीर झाला तर आम्ही थांबणार नाही तो पुढाऱ्यांचा मोठेपणा ठरेल असे गुलाब गायकवाड यांनी सांगितले. प्री वेडींग अजिबात करू नये कारण त्यामुळे प्री-वेडिंगच्या नावाखाली बाहेर गावी जाऊन अनेक चाळे होत असल्यामुळे लग्न मोडण्याचे प्रमाण वाढले आहेत . लग्नाचा खर्च मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या व्यवसायाच्या भांडवलासाठी करावा . नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी समाजातील एका ज्येष्ठ व्यक्तीला सांगावे .ज्या कुटुंबाची पार्श्वभूमी सुनेचा हुंडा किंवा काही कारणास्तव छळ होत असेल तर अशा कुटुंबाशी संबंध होणार नाही याची काळजी घ्यावी. सासरी होणाऱ्या अन्यायाबद्दल मुलीच्या पुढील जीवन सुसह्य होण्यासाठी माहेरच्या लोकांनी पुढाकार घ्यावा .

मराठा समाजातील लोक घेऊन एक कमिटी तयार करून तिचे कार्य चालू करावे मंगळ कार्यालयाच्या बाहेर मराठा समाजाची आचारसंहिता लावावी .जेणे करुन तिचे पालन होईल पन्नास लग्न कार्यापैकी दहा जणांनी जरी आचारसंहितेचे पालन केले तरी ती मराठा समाजाची एक चांगली सुरुवात होईल असे कमलेश काळभोर यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!