Homeराजकीयभाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे

खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक

उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली झलक

आळंदी म्हातोबा येथील खेंगरेमळा परिसरातील रस्ता अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या ये-जा करण्यास अत्यंत अडथळ्याचा ठरत होता. पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धूळ यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मात्र प्रलंबितच राहिला होता.

दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते व उमेदवार प्रकाश शेठ सावंत यांच्या निदर्शनास ही समस्या ग्रामस्थांनी आणून दिली. प्रचारापुरती आश्वासने न देता त्यांनी तत्काळ निर्णय घेत स्वखर्चाने खेंगरेमळा येथील रस्त्याचे मुरुमीकरण करून दिले. अवघ्या काही दिवसांत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या तात्काळ कृतीमुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून प्रकाश शेठ सावंत यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. “नेता असावा तर असा, जो समस्या ऐकताच उपाय करतो” अशा शब्दांत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ भाषणांवर न थांबता प्रत्यक्ष काम करून दाखवणारे नेतृत्व म्हणून प्रकाश शेठ सावंत यांची ओळख अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.

खेंगरेमळा रस्त्याच्या प्रश्नावरून प्रकाश शेठ सावंत यांनी दाखवलेली ही कृतीशीलता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत निश्चितच जनतेच्या विश्वासाला बळ देणारी ठरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.या कामात प्रशांत जवळकर. विजय भैय्या जवळकर हर्षल जवळकर या स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली व युद्धपातळीवर हे रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.अशाच प्रकारे त्यांनी गावातील इतर प्रश्नांकडे देखील लक्ष देऊन काम तडीस न्यावे असे स्थानिकांनी मत मांडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!