Homeसामाजिकपत्रकार कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय — वैद्यकीय खर्चात ५०% सवलतीचा लाभ मिळणार!

पत्रकार कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय — वैद्यकीय खर्चात ५०% सवलतीचा लाभ मिळणार!

पत्रकार कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय — वैद्यकीय खर्चात ५०% सवलतीचा लाभ मिळणार!

उरुळी कांचन (ता. हवेली) – पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे यांच्याप्रयत्नांना यश मिळाले डॉक्टर वेलफेअर असोसिएशन, उरुळी कांचन यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या मोठ्यात निर्णयानुसार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना — म्हणजे आई-वडील, पत्नी व मुले यांना वैद्यकीय उपचारांमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. हा लाभ १५० हून अधिक रुग्णालयांमध्ये मिळणार असून, ही योजना लवकरच अंमलात येणार आहे.

सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून डॉक्टर वेलफेअर असोसिएशनने हा निर्णय घेतला असून, पत्रकारांच्या सेवेला दिलेल्या मान्यतेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. प्रा. माथेफोड यांच्या पुढाकाराने हे काम शक्य झाले आहे. या निर्णयामुळे अनेक पत्रकार कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ असून, अनेकदा ते स्वतःच्या आरोग्यापेक्षा कर्तव्यास प्राधान्य देतात. अशा वेळी त्यांच्यासाठी ही योजना आश्वासक ठरणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर जिल्ह्यांमध्येही अशी योजना राबवण्याची मागणी होऊ लागली आहे.रविवारी झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गणेश आखाडे,उपाध्यक्ष डॉ प्रशांत शितोळे, डॉ उमा कथले, डॉ शरद गोते, डॉ परिमल परदेशी, डॉ समीर ननावरे, डॉ विजय फडतरे, डॉ सुनील गांगुर्डे यांच्या हस्ते सवलतीचे पत्र उपस्थित पत्रकार राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन सुंबे,राज्य उपाध्यक्ष नितीन करडे,भाऊसाहेब महाडिक,सहदेव खंडागळे,सुनील तुपे,चंद्रकांत दुंडे यांना देण्यात आले.

कोट 

पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे

लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकार तसेच समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करणारा पत्रकार आर्थिक बाबतीत नेहमीच मागे पहायला मिळतो.समाजाच्या हक्काचा झालेला तो कुटुंबियांच्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत मात्र नेहमीच अपुरा पडत असतो.त्यात स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वैद्यकीय गरज पडली तर नेहमी इतरांच्या उपयोगी पडणाऱ्या पत्रकारांना मात्र हाती निराशाच येते.म्हणून त्याची गैरसोय होऊ नये म्हणून व अशावेळी कोणाच्याही हातापाया त्याला पडायला लागू नये म्हणून हा उपक्रम राबविणे खूप गरजेचे होते.१५० हून अधिक हॉस्पिटल्स असणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक पत्रकाराला व त्याच्या कुटुंबियांना योग्य व सवलतीच्या दरात उपचार मिळतील आता त्यासाठी त्याला कोणाचेही पाय धरण्याची आवश्यकता नाही.यासाठी राज्य उपाध्यक्ष विजय लोखंडे तसेच केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याचसोबत पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन व वाघोली डॉक्टर असोसिएशन या संघटनांशी देखील बोलणे झालेले असून थोड्याच दिवसात त्यांच्याकडे देखील ही योजना अमलात येईल.ही योजना पत्रकार बांधवांसाठी एक मोठा आधार ठरेल, हे निश्चित!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...

सचिन माथेफोड,पुणे महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य...

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

error: Content is protected !!