Homeताज्या बातम्याथेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड

थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने एकवटल्याने परिसरात भगव्या लाटेचे चित्र दिसून आले.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास आमदार डॉ. राहुल दादा कुल (दौंड विधानसभा) तसेच भाजप पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप दादा कंद यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगळवार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी  ग्रामपंचायत कार्यालय शेजारी, क्षेत्र थेऊर येथे हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात हवेली पंचायत समिती गट क्रमांक १७ चे उमेदवार ह. भ. प. योगेश दत्तात्रय काकडे, पुणे जिल्हा परिषद गट क्रमांक ४० च्या उमेदवार सौ. पुष्पलता प्रकाश सावंत तसेच हवेली पंचायत समिती गट क्रमांक ८० च्या उमेदवार सौ. पुनम अशोक गायकवाड यांचा भव्य प्रचार शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाजप सरकारच्या विकासकामांचा आढावा घेत मतदारांशी संवाद साधला. “कामाचा माणूस, हक्काचा माणूस” या भूमिकेतून आव्हाळवाडी–थेऊर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे नमूद करत येणाऱ्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी आव्हाळवाडी,आळंदी म्हातोबा,थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी,मांजरी या गावांमधील राजकीय सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला महिला-भगिनी, युवक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली. या जोरदार प्रतिसादामुळे आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची ताकद स्पष्टपणे दिसून आली असून, आगामी निवडणुकीत भगव्याचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

error: Content is protected !!