Homeराजकीयएका श्रद्धाळू विचारातून सुरू झालेल्या या यात्रेनेएकाच वेळी १५०० भाविकांचे तिरुपती बालाजी...

एका श्रद्धाळू विचारातून सुरू झालेल्या या यात्रेनेएकाच वेळी १५०० भाविकांचे तिरुपती बालाजी दर्शन संपन्न रचला इतिहास

प्रा सचिन महाराज माथेफोड

मांजरी खुर्द : प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान, मांजरी खुर्द यांच्या वतीने आयोजित तिरुपती बालाजी दर्शन यात्रेने अभूतपूर्व असा विक्रम रचत इतिहासात पहिले पान लिहिले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये एकाच वेळी तब्बल १५०० भाविकांचे दर्शन संपन्न झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्पष्ट झाले. कुठलीही विशेष योजना न करता योगायोगाने घडलेल्या या घटनामुळे भाविकांमध्येही प्रचंड समाधान व आनंदाचे वातावरण आहे.

ही भव्य यात्रा ३ डिसेंबर २०२५ रोजी म्हातोबाची आळंदी येथून मोठ्या उत्साहात प्रस्थान झाली. गावातील सुमारे १५०० भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेसाठी २७ आराम बस, तसेच आयोजनासाठी आवश्यक चारचाकी वाहने सोबत होती. संपूर्ण मार्गावर आपत्कालीन परिस्थितीसाठी तज्ञ डॉक्टरांची टीम व रुग्णवाहिकेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

भाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक ठिकाणी जेवण, नाश्ता, चहा-पाणी याची उत्तम आणि शिस्तबद्ध सोय केली होती. तसेच निवासाची सोयही काळजीपूर्वक उपलब्ध करून देण्यात आली.

“इतिहास घडेल अशी कल्पनाही नव्हती; परंतु हे सर्व बालाजींच्या कृपेने घडले,” अशी भावना प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री. प्रकाशशेठ सावंत यांनी व्यक्त केली. संपूर्ण यात्रेदरम्यान सौ. पुष्पलता (सीमाताई) प्रकाशशेठ सावंत या स्वतः सर्व भाविकांच्या जेवण, नाश्ता आणि राहण्याच्या सोयींसाठी सतत तत्पर होत्या.त्याचसोबत योगेश काकडे देखील संपूर्ण वेळ या यात्रेत सहभागी होऊन यात्रेकरूंच्या प्रवासात त्यांची काळजी घेत होते. सर्वांना एकाच वेळी दर्शन मिळाल्याने त्यांनीही अत्यानंद व्यक्त केला.

ही यात्रा श्रद्धाळूपणाचे, उत्तम व्यवस्थापनाचे आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!