प्रा सचिन माथेफोड,पुणे
हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हडपसर मेडिकल असोसिएशन व एएमसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मूक मोर्चा लोहिया उद्यान, हडपसर येथून सुरू होऊन सह्याद्री हॉस्पिटल – हडपसर पोलिस स्टेशन – पुन्हा सह्याद्री हॉस्पिटल असा मार्ग पार करणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पुणे परिसरातील सर्व दवाखाने व हॉस्पिटल्स दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इमर्जन्सी व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी आयोजकांनी स्पष्ट केले की वैद्यकीय क्षेत्रावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कडक भूमिका घेण्याची गरज असून, अशा घटनांना आळा बसावा यासाठी हा शांततामय निषेध आयोजित करण्यात आला आहे.



















