प्रा.सचिन माथेफोड,पुणे
ki
मौजे थेऊर येथील, दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन करून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. गेली अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. पहिल्या टप्प्यात १० लक्ष रुपये निधी मंजूर असून, पुढील काळात टप्प्या-टप्प्याने, उर्वरीत रस्त्याचे काम केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. भूमिपूजनावेळी युवराज काकडे, भरत कुंजीर, नवनाथ कुंजीर, गणेश साळुंखे, रामचंद्र उर्फ बाबू बोडके, गोरख काळे, बाळासाहेब कुंजीर, तुकाराम कुंजीर, आनंद काकडे, बाळासाहेब गिरमकर, दिलीप गावडे, सुभाष गावडे, पांडुरंग दळवी, उत्तम दळवी, स्वप्नील दळवी, सिद्धेश्वर कुंजीर, अच्युत कुंजीर, शरद कुंजीर, विक्रम काळे आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



















