आळंदी म्हातोबा येथील श्री दत्त जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमला. अभिषेक, महाआरती, भजनाचा दिमाखदार व भावस्पर्शी कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडला.
कै. म्हातू पाडुरंग जवळकर (पाटील) यांच्या स्मरणार्थसुमित पाटील जवळकर व प्रणालीताई सुमित जवळकर यांनी मंदिरात कायमस्वरूपी ज्ञानेश्वरी ग्रंथ व टाळ भेट देत एक समाजहिताचा पुण्यस्पर्शी उपक्रम राबविला.यावेळी गावासाठी वर्षभर सेवा करणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या योगदानासाठी विशेष सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये –
🔹 केशव काका तिखे – विठ्ठल मंदिरातील वर्षभर सेवा
🔹 प्रविण राजगुरू व पुत्र अवधूत राजगुरू – श्री म्हातोबा जोगेश्वरी सेवा
🔹 दादा गोसावी व पुत्र बंडू नाना गोसावी – पाडुरंग सेवेसाठी उल्लेखनीय कार्य
🔹 आध्यात्मिक, शैक्षणिक व कीर्तन क्षेत्रातील कार्याबद्दल आदर्श शिक्षक, प्रसिद्ध पत्रकार, प्रख्यात कीर्तनकारप्रा. सचिन महाराज माथेफोड यांचा विशेष सन्मान
या सर्वांचा सन्मान करण्याचा मान सुमित पाटील जवळकर व प्रणालीताई यांना लाभला.हा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांना लाभलेली “दत्तकृपा” असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
उपस्थित मान्यवरांमध्ये –
दिलीप नाना वाल्हेकर, दत्तात्रय (दादा) जवळकर, रतन झेंडे, दयानंद शिवरकर, बाळासाहेब जवळकर, हरि काळभोर, विनायक भाऊ जवळकर, राजू दगडे, दिपक नाना जवळकर, दादा जवळकर, अशोक भाऊ जवळकर, दादा वाल्हेकर, अशोक वाल्हेकर, विजय गणपत जवळकर, शंकर जवळकर, आबासाहेब जवळकर, शंकर क्षिरसागर, शिवाजी जाधव, संदिप पवार, भाऊ कुंजीर, तेजस शिवरकर, सायलीताई शिवरकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व उपस्थितांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.
















