सचिन माथेफोड,पुणे
लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत दुहेरी पदक पटकावले असुन त्यांची राष्ट्रीय पदासाठी निवड झाली आहे.
मास्टर गेम्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा पिंपरी चिंचवड या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील असंख्य खेळाडूंनी भाग घेतला होता. भाऊसाहेब महाडिक यांनी उंच उडी प्रकारात तृतीय क्रमांक व तिहेरी प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला पुढील महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भाऊसाहेब महाडिक यांची निवड झाली आहे. क्रीडा विभागाचे प्रमुख भाऊसाहेब महाडिक हे पत्रकार असून त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . भाऊसाहेब महाडिक यांचे अभिनंदन ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री, संस्थेचे संचालक अविनाश शेलूकर,संचालिका परवीन इराणी, एंजल हायस्कूलच्या प्राचार्य शमशाद कोतवाल, एंजल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य खुशबू सिंग,एंजल हायस्कूलचे व्यवस्थापक निलेश अडसूळ ,एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या व्यवस्थापिका नंदा डोंगरे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



















