सचिन माथेफोड,पुणे
बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके यांचा मोठ्या फरकाने विजयलोणी काळभोर प्रतिनिधी – बारामती नगर परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट )३५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले .बारामती नगर परिषदेत ४१ जागांपैकी ८ जागा अजित पवार गटाने बिनविरोध जिंकल्या होत्या, उर्वरित ३३ जागांसाठी मतदान झाले. विरोधकांना एकूण ६ जागा मिळाल्या आहेत . नगराध्यक्षपदी सचिन सातव यांनी बाजी मारली. तर प्रभाग ७ अजित पवार गटाच्या सौ. भारती शेळके यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली . सौ .भारती शेळके यांना १०६५ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या मेघा सुरेंद्र जेवरे यांना ३५४ मते मिळाली.
सौ. भारती शेळके या विजयी होताच अशोक नगर भागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच ढोल ताशांच्या गजरात महिलांनी उत्स्फूर्तपणे डान्स करत विजय साजरा केला. सौ. भरती शेळके या अनेक वर्षापासून महिलांसाठी काम करत असून सात नंबर प्रभागात अनेक महिलांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे भारती शेळके या प्रचंड मतांनी निवडून आल्याचे प्रभागातील महिलांनी सांगितले .यावेळी सौ. भारती शेळके यांनी सांगितले की बारामतीच्या विकासासाठी व प्रभागाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून वेळोवेळी अजित दादांचे मार्गदर्शन खूपच मोलाचे ठरले आहे .



















