सचिन माथेफोड,पुणे
दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी मांजरी खुर्द मधून प्रस्थान झाला. एकूण ५१ आराम बस, वैद्यकीय सेवा रुग्ण वाहिनी आणि इतर ११ नियोजन वाहने असा भव्य ताफा भाविक उजैन दर्शन यात्रेसाठी निघाले. एकूण २५९३ भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला. यात्रेतील सर्व भाविकांनी श्री महाकाल महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
संपूर्ण यात्रेमध्ये सर्व भाविकांची चहा, नाष्टा, जेवण, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा आणि संपूर्ण प्रवास सेवा प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान मांजरी खुर्द यांच्या वतीने मोफत केली गेली.
संपूर्ण यात्रा महाकाल महाराजांच्या कृपेने आणि अहोरात्र मेहनत घेत असलेल्या स्वयंसेवक आणि नियोजक यांच्या जीवावर यशस्वी पूर्ण केली त्या बद्दल प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री प्रकाशशेठ सावंत यांनी विशेष आभार व्यक्त केले.
त्याच प्रमाणे विविध मान्यवरांनी यात्रे बद्दल मोठ्या प्रेमाने आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत यांनी सर्व भाविकांनी यात्रेत सहभागी झाल्या बद्दल आणि संपूर्ण प्रवासात दाखविलेले प्रेम आणि सहकार्य याबद्दल विशेष आभार मानले. श्री योगेश नाना काकडे यांनी देखील सर्व सहभागी भाविकांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानले व कामाचे कौतुक केले. यापुढेही अशेच सहकार्य व प्रेम लाभावे अशा भावना प्रकाशेठ सावंत प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केल्या.



















