Homeराजकीयजिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण... आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे

जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी गट क्रमांक ४० मध्ये निर्णायक घडामोड घडली असून, आव्हाळवाडी गावाने फुटीर राजकारणाला ठाम नकार दिला आहे.शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी गावात घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीत माजी सभापती नारायण आव्हाळे गट व संदेश आव्हाळे गट एकत्र आले असून, “एक गाव – एक उमेदवार” या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत नेहमीच मतांचे विभाजन करून संधी साधणाऱ्यांना या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. आमदार माऊली कटके यांनी मध्यस्थी करत मतभेद संपवले आणि गावाच्या विकासासाठी एकजूट हाच एकमेव मार्ग असल्याचे ठामपणे मांडले.

या बैठकीस गावातील आजी व माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध कार्यकारी मंडळांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेले सर्व घटक एका व्यासपीठावर आल्याने ही बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

“एक गाव – एक उमेदवार” ही भूमिका केवळ घोषणा न राहता जिल्हा परिषद निवडणुकीतील गेमचेंजर ठरणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आव्हाळवाडीने दिलेला हा संदेश म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाला खुले आव्हान असून, येत्या निवडणुकीत याचे पडसाद संपूर्ण गटात उमटण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद उमेदवार कोमल संदेश आव्हाळे यांना गावाने एकमुखाने पाठिंबा दिल्याने उद्यापासून संपूर्ण गाव त्यांच्या प्रचारासाठी फिरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

error: Content is protected !!