प्रा सचिन माथेफोड,पुणे
थेऊर येथील आदर्श माता सौ. कमल विष्णनाथ तांबे (वय 62) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
थेऊर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विष्णनाथ तांबे यांच्या पत्नी व अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांची मातोश्री होत्या.
अंत्यविधीस थेऊर परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून श्रद्धांजली अर्पण केली.



















