Homeराजकीयसौ. पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व...

सौ. पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद, तब्बल 8088 नागरिकांची तपासणी.!

प्रा सचिन महाराज माथेफोड,पुणे

थेऊरसह परिसरातील आळंदी, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांत सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने, आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.

आळंदी, कुंजीरवाडी, थेऊर, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांतील एकूण 8088 नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवला. यातील 5180 नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली, यातील 3924 नागरिकांना मोफत चेसम्यांचे वाटपात करण्यात आले. तसेच 388 नागरिकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांचे निदान झाले असून, यातील 80 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडल्या असून, उर्वरीत शस्त्रक्रिया टप्प्या-टप्प्याने सुरू आहेत. तसेच 9 अपंग बांधवांच्या हात व पायांचे मोजमाप घेऊन, त्यांना काही दिवसात कृत्रिम हात-पाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच 7 नागरिकांवर कान/नाक/घसा तर काही रुग्णांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

गावोगावी फिरून नागरिकांची विचारपूस करून, त्यांच्या आरोग्याच्या गरजा ओळखून थेट तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देणारा हा प्रयत्न ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरला आहे. विशेषतः मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव बसविणे, हाडांचे आजार, डोळे व कान-नाक-घसा तपासणी या सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने अनेकांना तात्काळ उपचार मिळाले.

सौ. पल्लवी युवराज काकडे म्हणाल्या, “शरीर हीच खरी संपत्ती असून, तीचे जतन म्हणजेच आरोग्याची काळजी घेणे, ही काळाची गरज बनली आहे. याचअनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना, गावोगावी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व सवलतीच्या दरात उपचार करून देऊन, गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबांना आधार देणे, हे आमचे ध्येय आहे.

मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा, घरोघरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना असून, या उपक्रमामुळे अनेक नागरिकांचे जीवनमान निरोगी व सुखकर झाले आहे. यामुळे सौ.पल्लवी युवराज काकडे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मोठा हातभार लागला असून, महाआरोग्य शिबिरांच्या या यशस्वी उपक्रमाकडे, ग्रामीण भागात ‘आरोग्य क्रांतीचे एक नवीन पाऊल’ म्हणून बघितले जात आहे.

थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी, 2015 सालापासून, 10 वर्षे अविरतपणे हजारो गोरगरीब रुग्णांना केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे, त्यांना समाजाकडून “आरोग्यदूत” म्हणून संबोधले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

error: Content is protected !!