भेकराई येथील सोना आई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज दिनांक 7/7/2025 रोजी ‘ग्रीन डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी ते पहिली चे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हिरव्या रंगाच्या वेशभूषेत सहभागी होत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाची फळे, भाजीपाला, झाडे आणि पर्यावरणाचे महत्त्व दर्शवणारे पोस्टर्स परिधान केली. लहान मुलांनी डान्स करत कार्यक्रम रंगतदार बनवला अशा उपक्रमांमुळे लहान वयातच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होते.
शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. कार्यक्रमासाठी स्वर्णा राव मॅडम,
सोनिया मॅडम,संदेश सर, मुख्याध्यापिका, शिक्षक यांची उपस्थिती होती.
















