सुभाष कड,पुणे
सोरतापवाडी ग्रामस्थांचा पंचायत समिती उमेदवार सुधर्शन चौधरी यांना एकमुखी पाठिंबा
ऊरूळी कांचन – पंचायत समिती गट क्रमांक ५ (सोरतापवाडी, तरडे, वळती, शिंदवणे) येथून उमेदवारी अर्ज करणारे सुदर्शन चौधरी यांना सोरतापवाडी ग्रामस्थांनी जोरदार व एकमुखी पाठिंबा जाहीर केला. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, तरुणाई तसेच विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या गावातून एकमुखाने जरी पाठिंबा मिळाला असला तरी भाजपच्याच कार्यकर्त्या पूजा सणस यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून या गणात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक तीर्थयात्रा करून आणल्या आहेत.भाजपचा हाच उमेदवार असेल असा मतदारांचा कयास होत असतानाच राजकीय क्षेत्रात जुने खेळाडू असणारे व स्थानिक राजकीय वाऱ्याचा चांगलाच अनुभव असलेल्या तसेच बाजार समितीच्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी असलेलें भाजपचेच सुदर्शन चौधरी मैदानात उतरल्याने या निवडणुकीला रंग आला आहे.एकाच पक्षातील दोन उमेदवार समोरासमोर असल्याने मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची मात्र द्विधा मनस्थिती झाली असून आता तेच एकमेकांना विचारत आहेत,”व्हय…आता कसं करू”.
जरी गावाच्या बैठकीत गावातील लोकांनी सुदर्शन चौधरी यांना पाठिंबा दिलेला असला तरी अजून अनेक तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत व जसजसा निवडणुकीला रंग येईल तसतसे अजून अनेक उमेदवार रिंगणात येतील.तसेच गावातील गटातटाच्या राजकारणात एकमुखाने केव्हाच निर्णय होत नसतो.मग एकतर उघड विरोध असतो किंवा छुपा विरोध असतो.त्यामुळे ग्रामस्थ येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांना कशापद्धतीने साथ देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.सध्या तरी सुदर्शन चौधरी यांचे नाव चर्चेत आल्याने मतदार देखील चर्चा करत आहेत “व्हय आता कसं करायचं”



















