Homeराजकीयमौजे आव्हाळवाडी येथील मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

मौजे आव्हाळवाडी येथील मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

सचिन माथेफोड,पुणे

मौजे आव्हाळवाडी, ता. हवेली येथे सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये तब्बल 1380 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

शिबिरादरम्यान 900 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 753 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 47 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, या सर्वांवर आगामी काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. याशिवाय 2 नागरिकांना कृत्रिम हात व पाय मिळण्यासाठी नोंद केली.

या आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन, शुगर चाचणी, रक्तदाब मापन तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध आरोग्य सेवांचा समावेश होता.

सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे, आव्हाळवाडी परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे, या आरोग्य शिबिराचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

या शिबिरास पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेशबापू सातव,माजी उपसरपंच मंगेश सातव, माजी उपसरपंच प्रशांत सातव, ग्रामपंचायत सदस्य अमोल आव्हाळे, युवानेते किरण आव्हाळे, राम आव्हाळे,संकेत आव्हाळे, नितीन आव्हाळे, हर्षल आव्हाळे, सुबोध सातव, निलेश सातव, विशाल कुटे इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!