Homeताज्या बातम्यामहिला सशक्तीकरणाचा उत्सव : प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान व योगेश काकडे यांच्या...

महिला सशक्तीकरणाचा उत्सव : प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान व योगेश काकडे यांच्या वतीने कुंजीरवाडीत भव्य ‘हळदीकुंकू–होम मिनिस्टर’ कार्यक्रम

सचिन माथेफोड,पुणे

 महिला मतदारांच्या वाढत्या सहभागाचे आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा उत्साहवर्धक उपक्रम पूर्व हवेली परिसरात आयोजित करण्यात आला आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना एकत्र आणत त्यांचा सन्मान व सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने भव्य ‘हळदीकुंकू’ व ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन कुंजीरवाडी व आळंदी म्हातोबा येथील महिलांसाठी करण्यात आले आहे.गटातील इतर गावांसाठी देखील कार्यक्रम गावोगावी करण्याचे नियोजन आहे असे नियोजनकर्त्यांकडून सांगण्यात आले.

पूर्व हवेलीतील थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पुष्पलता प्रकाश सावंत तसेच पंचायत समिती गणासाठी सक्रिय असलेले योगेश दत्तात्रय काकडे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. महिला भगिनींसाठी आनंद, स्नेह आणि सशक्तीकरणाचा अनुभव देणारा हा उपक्रम रविवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी कुंजीरवाडी येथील कुंजीर लॉन्स येथे सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे महिलांसाठी ठेवण्यात आलेली समृद्ध बक्षिसांची मालिका. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी, फ्रिज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, एलईडी टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर तसेच आकर्षक पैठण्या यांचा समावेश असून एकूण १६ बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे पाच दुचाकींचा समावेश या बक्षिसांमध्ये असून त्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

मांजरी येथे प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान व योगेश नाना काकडे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ मालिकेत येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सिनेअभिनेता संदेश चौधरी यांच्या सुसूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात रंगत वाढणार आहे.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी प्रत्येक महिला भगिनीला सन्मानचिन्ह म्हणून सोन्याच्या दागिन्याची भेट दिली जाणार आहे. त्यामुळे कुंजीरवाडी व आळंदी म्हातोबा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा महिला सशक्तीकरणाचा उत्सव अनुभवतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

error: Content is protected !!