Homeसामाजिकभजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद : सांस्कृतिक रंगात रंगला परिसर

भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद : सांस्कृतिक रंगात रंगला परिसर

सचिन माथेफोड,पुणे

पंचायत समिती थेऊर गटांमधील आळंदी – म्हातोबा – कुंजीरवाडी येथील भजनी मंडळांच्या सहभागामुळे भजन स्पर्धेला विलक्षण उत्साह लाभला. सकाळपासूनच परिसरात भक्तिरसाचे वातावरण दाटून आले होते. प्रत्येक मंडळाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत भजने सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन ह.भ.प. योगेश काकडे, ह.भ.प. नवनाथ काकडे तसेच सौ. पुष्पलता प्रकाश सावंत यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धेचे सर्व कामकाज शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने पार पडले.

स्पर्धेत उपस्थितांची गर्दी इतकी वाढली की आयोजकांना अतिरिक्त व्यवस्थाही करावी लागली. परीक्षकांनी सुर, लय, स्थायी- अंतरा, भावाभिव्यक्ती आणि सादरीकरणातील भक्तिरसाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सहभागी प्रत्येक भजनी मंडळास टाळ, वीणा, मृदंग आणि हार्मोनियम भेट देण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या मंडळांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व विशेष पारितोषिकांनी गौरव करण्यात आला. अखेरपर्यंत परिसर टाळ–मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमत राहिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!