प्रा.एस.एम सर,पुणे
नायगाव चौक हा आजुबाजूच्या पाच सहा गावांना जोडणारा मुख्य चौक असून देखील उरुळी कांचन ग्रामीण पोलिस स्टेशन व लोणी काळभोर सिटी पोलिस स्टेशन यांच्या हद्द वादावरून नेहमीच बेवारस अवस्थेत आढळतो.याचा परिणाम या चौकात नेहमीच ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवत असते.कधीतरी राजकीय नेतेमंडळी या रस्त्याने जाणार असतील तर त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी उपस्थित असतात.परंतु कायमस्वरूपी किंवा बाजाराच्या दिवशी व रविवारी या ठिकाणी दोन्ही पोलिस स्टेशनच्या संगनमताने एक एक कर्मचारी द्यावा अशी विनंती ग्रामस्थ करत आहेत.



















