थेऊर परिसरात काकडेमळा, तांबेवस्ती येथे जंगली गवारेडा आढळला असून, तो सध्या तांबे वस्तीवरील असणाऱ्या शेतातून, काकडे मळ्याच्या दिशेने गेल्याचे ग्रामस्थानी सांगितले आहे. तो परिसरातील लोकवस्तीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व ग्रामस्थांनी सतर्क रहावे. याबाबतची माहिती वन विभागास युवराज काकडे यांनी कळविली आहे. तरी सदर जंगली गवारेडा कोणाच्या घरासमोर आल्यास अथवा दिसल्यास, कोणीही त्याच्या जवळ न जाता, त्वरित संपर्क साधावा असे आवाहन युवराज काकडे यांनी केले आहे.



















