Homeमहत्त्वाचेथेऊर फाटा येथील केबल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; त्वरित उपाययोजनेची मागणी

थेऊर फाटा येथील केबल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; त्वरित उपाययोजनेची मागणी

थेऊर फाटा येथे केबल अंथरण्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर असलेले उघडे व अर्धवट बुजवलेले खड्डे अपघातास आमंत्रण देत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या मार्गावरून हजारो अनुयायी प्रवास करतात. अशा वेळी या ठिकाणी असलेले खड्डे मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना अण्णासाहेब बोडके, हवेली तालुका उपाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी सांगितले की, “येथे केबल टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते; मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कोणतीही तपासणी किंवा पूर्णत्वाची जबाबदारी न घेता काम अर्धवट सोडण्यात आले आहे. खोदलेले खड्डे तसेच उघडे असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत व रस्ता पूर्ववत करावा.”

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्वरित काम पूर्ण करून सुरक्षितता सुनिश्चित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!