सचिन माथेफोड,पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ
आळंदी म्हातोबा येथील जागृत ग्रामदैवत समजणाऱ्या श्री म्हातोबा जोगेश्वरी देवस्थान जागेचा विकास करणे सुरू असून एकूण जागांपैकी उपलब्ध असणारी 22 एकर जागेचा विकास सुरू आहे.या जागेवर दोन एकर मध्ये लोकवर्गणीतून शेततळे बनविण्यात आलेले आहे व उरलेली जागा भाडेतत्वावर देण्यात आलेली आहे.सदरील चालू असलेल्या कामामुळे या जागेचा कायापालट झालेला असून गावातील ग्रामस्थ स्वयस्फूर्तीने या जागेच्या विकासासाठी सहकार्य करत आहेत.मागील अनेक वर्षांपासून ही जागा पडीक होती परंतु सदरील जागेपासून उत्पन्न सुरू करून भविष्यात गावाच्या विकासासाठी तसेच गावातील विविध कार्यक्रमांसाठी या उत्पन्नाचा वापर केला जाईल असे कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जवळकर व वाल्मीक जवळकर यांनी सांगितले.सदरील कामासाठी बाहेर गावावरून देखील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सहकार्य केलेले असून त्यांचे आभार कृती समितीने मानले आहे
















