प्रा.एस एम सर,पुणे
दिनांक 21.10.2025 रोजी दीपावली- लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून पुण्यातील कुंजीरवाडी येथील विश्व बॅकवेट हॉल उदघाटन प्रसंगी शिरूर -हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, चंदननगर -लोहगावचे आमदार पठारे, हॉल मालक ह. भ. प. बाळू आप्पा चौधरी, हवेली तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, यशवंत सहकारी साखर कारखाना, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक क्षेत्र, विविध गावच्या ग्रामपंचायती आदी क्षेत्रातील चेअरमन, मान्यवर व प्रेषक उपस्थित होते. हॉल उदघाटनंतर विचारपीठाच्या स्टेजवर काकासाहेब उर्फ सोपान जवळकर लिखित ‘गाव ‘ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार ज्ञानेश्वर कटके व आळंदी म्हातोबा गावचे माजी उपसरपंच अशोकभाऊ जवळकर यांच्या हस्ते सर्व उपस्थितांच्या समोर पार पडले. यावेळी विविध मान्यवर व प्रेषक उपस्थित होते. ‘गाव’ या पुस्तकास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची खूपच आकर्षक प्रस्तावना लाभली आहे. गावातील पहाट, गावातील जनावरे, डोंगराच्या चंद्रकोरीत वसलेलं गाव, गावातील खेळ,ओढे -नाले, गावातील आपुलकी जपणारी कष्टाळू माणसे, गावातील वाडे आणि घरे, रस्ते, शेती, पक्षी, परिस्थिती, चावडी व देवळामधील गप्पा गोष्टी, लोहारआळी, कुंभारवाडा, नवरात्रीचा व जत्रेतील छबीना खेळ, शाळा, देवळातील सप्ताह व काकड आरती, त्यातील जुनी व नवीन वारकरी सांप्रदायीक माणसे, गावातील लग्नं, लग्नातील हळद व जेवणाच्या पंक्ती, जेवण वाढणारी व सामूहिक एकोपा जपणारी मंडळाची माणसे, गावपण जपणारी जुनी माणसे, कोंबडा आरवता पहाटे डोंगरात सरपणाला जाणारे मायबाप, गावातील बारंव व राहाटाच्या चाकावरून बादलीने पाणी शेंदण्याची मज्जा व रोजची कवायत, रोज बारंवहून पाणी वाहाण्याची कसरत, मामाचे गाव, गावच्या मातीतील उमाजी राजे यांची क्रांती, सत्यशोधक दिनकरराव जवळकर, गावातून देशासाठी लाभलेले कमांडो व कष्टकरी मायबापांचा इतिहास आणि मायबापाच्या कष्टावर उभा असलेला गाव अशा अनेक सहवासाने जपलेले गावपण आणि नांदता गाव, आदर्श गावे हिवरे बाजार आणि पाटोदा असे ग्रामीण संस्कृतीतील विविध अंतरंग म्हणजे ‘गाव’ हे पुस्तक.🙏
















