Homeशिक्षण-प्रशिक्षणओरिजनल मातोश्री स्कूल, सोरतापवाडी येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

ओरिजनल मातोश्री स्कूल, सोरतापवाडी येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

सुभाष कड, सोरतापवाडी

सोरतापवाडी येथील ओरिजनल मातोश्री स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नृत्याविष्कार अकॅडमीच्या अश्लेषा चोरघे या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच क्रीडा साहित्याच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरेल प्रार्थना व राष्ट्रप्रतिज्ञा सादर करून कार्यक्रमाला सुसंस्कृत स्वरूप दिले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर केला तसेच मशाल फेरीने संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली क्रीडा कौशल्ये दाखवली. धावणे, उड्या, समन्वय व कौशल्याधारित खेळांमुळे मैदान आनंद, उत्साह आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन अविनाश मेमाणे व रूपाली मेमाणे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व शिक्षण यांचा समतोल राखण्याचा संदेश दिला.

एकूणच ओरिजनल मातोश्री स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

error: Content is protected !!