Homeसामाजिकउरुळी कांचनचा सुपुत्र, एक हरहुन्नरी अवलिया सर्पमित्र"

उरुळी कांचनचा सुपुत्र, एक हरहुन्नरी अवलिया सर्पमित्र”

प्रा.एस.एम सर,पुणे

गेली १८ वर्ष साप आणि भक्ष्याच्या, अन्नाच्या शोधात चुकुन लोकवस्तीत येणा-या वन्य पशु-पक्षांना जिवदान देणारा एक अवलिया सर्प-प्राणी मित्र- खलिल शेख. संपूर्ण परिसर यांना मुन्नाभाई म्हणुन ओळखतो. व्यवसायाने ट्रॅक्टर मेकॅनिक असणा-या खलिलभाईंनी आजतागायत हजारो सापांना जिवदान दिले, तसेच शेकडो पशु-पक्षांचे पण प्राण वाचवले आहेत. दिवसा-रात्री चोविस तास कधिही फोन करा हे उपलब्ध असतात, व्यवस्थित माहिती विचारुन साप सापडेल कि नाही याचा यांना परफेक्ट अंदाज येतो आणि तो सहसा चुकत नसल्याच मुन्नाभाई अभिमानान सांगतात. आपल्या परिसरात भरपुर पाऊस झाल्याने हिरवाई खुप वाढली आहे. त्यामुळे उंदिर घुशी, खारुताई, बेंडकुळ्या आणि तत्सम सापाच्या खाद्याचे प्रमाण खुपच वाढले आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे साप लोकवस्तीत, घरात दिसु लागले आहेत. त्यामधे मुख्यतः विषारी सापामधे घोणस,मण्यार आणि नागांचे प्रमाण अविश्वसनीय पणे वाढल्याचे भाई सांगतात, आणि बिनविषारी सापांमधे धामण, कवड्या, तस्कर दिवड, डुरक्या, कुकरी, धुळनागिण, मांडुळ हमखास सापडतात. मानववस्तीत आलेल्या या सापांना जिवदान देताना, आणि समोरच्या माणसांच्या चेहे-यावरीर कृतज्ञतेचे भाव पाहुन केलेल्या धाडसाचे चीज झाल्याचे खलिलभाई अभिमानाने सांगतात. कैक वन्य पशुपक्षी त्यात हरिण, भेकर, सायाळ, उदमांजर, घोरपड घार,घुबड, मोर, कोकीळा, कावळा,टिटवी,मैना आणि अनेक जातींचा जिव वाचवल्याचे समाधान मिळाले असुन, पाळीवप्राणी त्यामधे कुत्रा, मांजर तर वाचवलेतच त्याच बरोबर त्यांनी अनेकदा बेवारस सोडुन दिलेल्या गोवंशांनापण सुरक्षित ठिकाणी पोचवले आहेत. हे सर्व कार्य करत असताना सर्प आणि वन्य पशुपक्षांच्या विषयी जनजागृती करण्याचे, लोकांचे प्रबोधन करण्याचे कामही अव्याहतपणे सुरु असुन त्यालाही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगताना भाई म्हणतात पुर्वी साप दिसला की लोक हमखास मारायचे, परंतु आता ९०% लोक आम्हाला बोलावतात. आणि आमच्याबरोबर त्यांच्याही चेहे-यावरच एक जीव वाचवल्याच समाधान पाहुन खुप आनंद होतो. रात्री-बेरात्री कधिही कुठेही साप नजरेस पडल्यास त्यास मारु नका, जवळच्या एका सर्पमित्राचा नंबर ठेवा, त्याला बोलवा, तो नसेल तर तो दुस-या सर्पमित्राला पाठवेल आणि त्या प्राण्या जिवंत घेऊन जाईल आणि तुमचीही सुरक्षितता राहिल. जसे आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. तसाच पृथ्वी वर जन्मलेल्या प्रत्येक जिवास आहे. निसर्गाचे हे वर्तुळच आहे. जसे त्यावर्तुळाचा एक भाग माणुस आहे, तसा प्रत्येक जीव पण आहे. जर संख्येत तफावत झाली, आणि वर्तुळ डळमळीत झाले तर जो काही परिणाम होईल त्याच वर्णन करणे अवघड आहे. म्हणुन कोणाचाही जगण्याचा हक्क हिरावण्याचा अधिकार कोणालाच नाही. अस म्हणताना खलिलभाई म्हणतात आजकाल स्वयंघोषित सर्प-प्राणिमित्रांचे प्रमाण खुपच वाढले असुन तत्सम प्राण्यांचे जिव वाचवण्यापेक्षा त्यांची हेळसांड करुन त्यावर रिल्स, व्हिडीओ बणवनारेच भरपुर झालेत आणि अर्धवट ज्ञान, आणि प्रसिद्धीच्या पाई कैक जणांना आपले प्राण पण गमवावे लागले आहेत. म्हणुन. वनखाते, आणि सरकारला विनंती आहे की अशा लोकांवर लक्ष ठेऊन त्यावर अंकुश ठेवण्याचे काम करावे. आणि सर्पमित्रांची लायकी पाहुन, त्यांची विविध प्रकारची परिक्षा घेऊन त्यांना परवाने वाटावेत, आणि विनापरवाना साप हाताळताना सापडला तर त्यावर कडक कायदेशिर कारवाई करावी.त्याच बरोबर गेली अनेक वर्ष सर्पमित्रांना मानधन आणि विमा देण्याविषयीचा प्रश्न मागे पडलाय, त्यावर पण सरकारने विचार करावा. असे केवळ मीच म्हणत नसुन जे आपला वेळ-काळ, उद्योग-व्यवसाय, नोकरी विसरुन पळतात त्या सर्व सर्प आणि प्राणि मित्रांचे मनोगत असल्याचे खलिलभाई म्हणतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

error: Content is protected !!