प्रा एस. एम सर,पुणे
आळंदी म्हातोबा येथे नुकतेच पोलिस पाटील कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या ठिकाणच्या पोलिस पाटीलपदी सोनाली शिवरकर कार्यरत असून त्यांच्या पुढाकारातून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.दत्तात्रय सातभाई ,सरपंच सोनाली जवळकर,उपसरपंच दयानंद शिवरकर,सदस्य सायली शिवरकर,नवनिर्वाचित चेअरमन दिलीप वाल्हेकर,भगवान जवळकर,अशोक जवळकर,युवराज काकडे,दत्तात्रय जवळकर,वाल्मीक जवळकर,सुभाष जवळकर,बाळासाहेब शिवरकर,आबासाहेब जवळकर,मोहन जवळकर,मोहन कुंजीर,शंकर जवळकर,तेजस शिवरकर,संदीप पवार,विजय सुर्वे,जनार्दन खटाटे,माऊली जवळकर,लक्ष्मण भोंडवे,राहुल जवळकर,प्रतीक शिंदे,पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी दादा पाटील काळभोर,विजय टिळेकर,दत्तात्रय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यालय स्थापन करण्यासाठी अनेक मान्यवरांनी आर्थिक व वस्तुरूपात सहकार्य केले. या कार्यालयामुळे गावातील नागरिकांना पोलिस संबंधित कामकाजासाठी मोठी सोय होणार असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत मिळणार आहे.
सोनाली शिवरकर यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की, “हे कार्यालय गावकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव खुले राहील आणि नागरिकांच्या अडचणी तत्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.



















