सचिन माथेफोड,पुणे
डेंग्यू व स्वाइन फ्ल्यूबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत जनजागृती; लक्षणे ओळखा, काळजी घ्या
पावसाळा सुरू होताच डेंग्यू व स्वाइन फ्ल्यू या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. हे लक्षात घेता जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत जनजागृती मोहीम राबवली जात असून, नागरिकांना या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे.याबाबत आरोग्य सहाय्यक श्री वाघमारे यांनी माहिती दिली
डेंग्यूची लक्षणे:
उच्च ताप (१०२ अंश फॅ. पेक्षा जास्त)
डोकेदुखी
डोळ्यांच्या मागे दुखणे
सांधेदुखी व स्नायू दुखणे
अंगावर पुरळ येणे
थकवा व अशक्तपणा
स्वाइन फ्ल्यूची लक्षणे:
ताप, सर्दी, खोकला
घसा दुखणे
अंगदुखी व डोकेदुखी
थकवा
काही वेळा उलटी किंवा जुलाब
घ्यावयाची काळजी:
घर आणि आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवणे
पाणी साचू न देणे (फूलपात्र, टाक्या, झारे यांची नियमित स्वच्छता)
पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे
मच्छरदाणी किंवा रिपेलंट्सचा वापर करणे
सार्वजनिक ठिकाणी तोंड झाकणे, मास्क वापरणे
सर्दी, ताप असल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे
भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घेणे
आळंदी म्हातोबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती देत असून, शाळा व ग्रामपंचायत स्तरावरही जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांनी कोणतीही लक्षणं आढळल्यास वेळ न दवडता नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



















