Homeसामाजिकआळंदी म्हातोबा कुंजीरवाडी रस्ता आता राम भरोसे...ग्रामपंचायत प्रशासनाने मोठा निर्णय घेण्याची आवश्यकता

आळंदी म्हातोबा कुंजीरवाडी रस्ता आता राम भरोसे…ग्रामपंचायत प्रशासनाने मोठा निर्णय घेण्याची आवश्यकता

प्रा.एस.एम सर,पुणे

दोन दिवसांपूर्वी आळंदी म्हातोबा व कुंजीरवाडी रस्त्याच्या अपूर्णतेबाबत वृत्त प्रसारित होताच.सदरील कामाचे कंत्राटदार किरण उंद्रे यांनी संपर्क साधला असता.नवीन बाबींचा खुलासा त्यांनी केला.त्यांच्या मते सदरील राहिलेले काम मी करण्यास तयार असून त्यासाठी मी एकूण तीन वेळा त्या ठिकाणी मशिनरी घेऊन आलो होतो परंतु स्थानिक प्रशासनाची उदासीनता त्या ठिकाणी जाणवते.तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे शेतकरी यासाठी विरोध करत असून त्या ठिकाणी जो पाणी जाण्यासाठी पाईप टाकायचा आहे त्यासाठी विरोध होत आहे.त्यामुळे सदरील काम राहिलेले असून याबाबत पोलिस संरक्षण मागविण्यात आलेले आहे,परंतु स्थानिक राजकीय प्रशासनाने या दोन्ही शेतकऱ्यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.पण याबाबत कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.माझे देखील काम केवळ त्या गोष्टीमुळेच राहिलेले असून मी त्या ठिकाणी पाईप आणून टाकलेले आहे.सदरील शेतकऱ्यांचा वाद मिटविला आहे असे कळताच मी अर्ध्या तासात माझे काम सुरू करेल असे बोलताना ते म्हणाले. तसेच गावातील अनेक लोक केवळ फोनवरूनच गप्पा मारत असून प्रत्यक्षात या विषयात सहकार्य करत नाही.राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी यामध्ये लक्ष घालून सदरील प्रश्न मिटवावा असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असल्या कारणाने या रस्त्याच्या बाबत कोणी राजकीय पदाधिकारी लक्ष घालेल का नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.जरी कोणी लक्ष घातले तर त्याला मतांच्या बाबत कोण शब्द देऊ शकते हा एक गुलदस्त्यातील प्रश्न असून अनेक बाहेर गावाचे राजकीय नेते मी नाही मदत केली तर पाहू कसा रस्ता होतोय ही मज्जा पाहण्यात व्यस्त आहेत तर या नेत्यांपुढे आम्हीच का सारखे सारखे जावे आणि शब्द द्यावा या उदासीनतेत ग्रामस्थ आहेत.पोलिस प्रशासनाने याबाबत एस पी ऑफिस यांच्याकडे संरक्षण देण्याबाबत विचारणा केलेली आहे परंतु जोपर्यंत संगनमताने दोन्ही शेतकरी यातून मार्ग काढत नाही तोपर्यंत रस्ता होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.आता ग्रामस्थानी एकत्र येऊन आंदोलनाची भूमिका जर घेतली तर याबाबत प्रशासन देखील जागे होऊ शकते परंतु सोशल मीडियावर व्यक्त होणारे प्रत्यक्षात मात्र वेळ देण्यास तयार नसतात ही शोकांतिका असल्या कारणाने सदरील रस्त्याचे काम सध्या राम भरोसे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!